पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

शिवसेनेचे महापालिकेत आक्रमक आंदोलन;संजय कुलकर्णी यांच्या निलंबनाची व अटक करायची मागणीवर ठाम

Spread the love

पिंपरी, १० जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेने आज महापालिका मुख्यालयात जोरदार आंदोलन छेडले. ‘दोषींवर कारवाई करा’ आणि ‘निष्काळजी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे बंद करा’ अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता.

मोशी येथील दुर्घटना ही नैसर्गिक नसून ती प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि नियोजनशून्य कारभाराचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. नगरसेविका सुलभा उबाळे, विश्वजित बारणे आणि पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या दुर्घटनेला जबाबदार असणारे पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर अटक व कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी शिवसेनेने केली आहे.आंदोलनादरम्यान बोलताना नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या की, “महापालिका केवळ चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा अधिकारी आणि ठेकेदारांना संरक्षण देणारी ही व्यवस्था आता बंद झाली पाहिजे. जर दोषींना अभय देण्याचा प्रयत्न झाला, तर शिवसेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल.”प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा रोष.वारंवार घडणाऱ्या दुर्घटना, नागरिकांच्या सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरील कारवाईचा अभाव यामुळे शहरातील सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे. मोशी दुर्घटनेनंतर प्रशासनाविरोधातील हा रोष दिवसेंदिवस वाढत असून, दोषींना शिक्षा मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

सध्या मोशी कचरा डेपोमधील बचावकार्य सुरू असतानाच, दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याने प्रशासनावर कारवाईचा मोठा दबाव वाढला आहे. आता प्रशासन यावर काय ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पोलीस  प्रशासन सज्ज संजय कुलकर्णी यांना अटक करण्याची मागणी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button