पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली;

Spread the love

पिंपरी, २० ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांची जयंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात सामूहिक सद्भावना शपथ घेऊन अत्यंत आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी महापालिका प्रशासनाच्या वतीने दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात महापौर रवि लांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासह उपमहापौर  शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी  प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याची सामूहिक शपथ घेतली. तसेच, सर्व धर्म, भाषा आणि समुदायांमध्ये परस्पर आदर व सद्भावना वाढविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. परस्परांमधील सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा मार्ग न स्वीकारता केवळ विचारविनिमय करून आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्यावर यावेळी भर देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button