पिंपरी चिंचवड

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतली घटनास्थळाची पाहणी; पीडित कुटुंबीयांना दिला धीर

Spread the love

 

पिंपरी, १० जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):

मोशी येथील घनकचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले आहे. या भीषण घटनेची दखल घेत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याचा त्यांनी आढावा घेतला.

पाहणीनंतर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आपल्या प्रियजनांच्या सुखरूप परतीची प्रतीक्षा करत असलेल्या या कुटुंबीयांच्या डोळ्यांतील अश्रू आणि चिंता पाहून उपमहापौर भावूक झाल्या. “या अत्यंत कठीण आणि वेदनादायी प्रसंगी महानगरपालिका प्रशासन आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे सांगत त्यांनी कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगरसदस्या योगिता नागरगोजे आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.सध्या घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि भारतीय सैन्यदलाचे जवान अहोरात्र प्रयत्न करत आहेत. बचावकार्यात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने युद्धपातळीवर काम करत असल्याचे उपमहापौर बाबर यांनी नमूद केले.दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या मोहिमेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष असून, तांत्रिक बाबींचा विचार करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उपमहापौरांनी संबंधित अधिकारी व बचाव पथकांशी चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

मोशी दुर्घटनेनंतर संपूर्ण शहराचे लक्ष या बचावकार्याकडे लागले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतल्याने पीडित कुटुंबांना काहीसा आधार मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button