मनोरंजनकलापिंपरी चिंचवड

सूर, संगीत आणि सन्मानाचा सुवर्णक्षण; पिंपरी-चिंचवडमध्ये दिमाखात संपन्न झाला २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ सोहळा!

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना मानाचा पुरस्कार प्रदान

Spread the love

पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ सोहळा आज श्री मोरयाच्या पावन भूमीत अत्यंत दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. संगीत विश्वातील या भव्य सोहळ्यात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना भारतीय संगीतसूर्य पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या शुभहस्ते मानाचा ‘आशा भोसले पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक गौरव घुले, श्री. कृष्णकुमार गोयल, पुरस्कार निवड समितीचे श्री. दिलीप काटकर, वंदना गांगुर्डे, रुणाल साकला, मानसी भोईर घुले यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि हजारो संगीतप्रेमी रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
सुमधुर स्वरांनी जिंकली उपस्थितांची मने
या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रेया घोषाल यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. स्वरांचे तेज, संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती आणि रसिकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद यामुळे ही सुरमयी संध्याकाळ समस्त पिंपरी-चिंचवडकरांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. आशा भोसले पुरस्काराची ही गौरवशाली शृंखला अशीच दिवसेंदिवस बहरत राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button