पिंपरी चिंचवड

प्रभाग २१ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार व २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

पिंपरी (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २१ मधील श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कौतुकास्पद सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासोबतच प्रभागनधील ज्युनिअर केजी ते आठवीपर्यंतच्या तब्बल २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली.

या दिमाखदार सोहळ्यास डॉ. गणेश शिंदे, स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे, नगरसेविका निकिता कदम, प्रियांका कुदळे, नगरसेवक विकास साने, माजी नगरसेवक श्रीरंग शिंदे यांच्यासह शशिकांत घुले, ज्ञानोबा गव्हाणे, सुधाकर यादव, उत्तम कुदळे, शांताराम सातव, रवींद्र वाघेरे, सतीश वाघेरे, प्रवीण कुदळे आदीमान्यवर उपस्थित होत.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ता डॉ. गणेश शिंदे म्हणाले, “यशाचा कधीही शॉर्टकट नसतो. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावरच विद्यार्थी आपली मोठी स्वप्ने साकार करू शकतात. शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व घडविणारे सर्वात प्रभावी साधन असून, स्पर्धेच्या या युगात केवळ गुणांपेक्षा कौशल्य, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी जिद्द कायम ठेवून आई-वडील व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करावे.

आपल्या मनोगतात नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “प्रभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. केवळ गुणवंतांचा गौरव करणे हाच उद्देश नसून, या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.”

कार्यक्रमात उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा अतिशय आकर्षक अशा लॅपटॉप आणि टॅब देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश होता. दिया संतोष रतनानी, गौरी राहुल अडपवार, श्वेता शरद पाचनकर,  लाविना प्रकाश कटारिया, श्रीर्षा श्रीपाद कुलकर्णी, यश राम मदने.तसेच इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात उपस्थितांच्या हस्ते प्रभाग २१ मधील ज्युनिअर केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या सुमारे **२२०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप** करण्यात आले. युवा मंचाच्या या समाजोपयोगी उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांनी तीव्र समाधान व्यक्त करत आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे मनःपूर्वक कौतुक केल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा मंचचे अध्यक्ष हरीष वाघेरे, किरण शिंदे, जितेंद्र वाटकर, रंजना जाधव आणि श्रद्धा देडे यांनी विशेष परिश्रम घेऊन नियोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेखर अहिरराव यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button