भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटन प्रवासात मोठी घडामोड; विजय (शीतल) शिंदे यांची ‘सरचिटणीस’ पदी निवड


पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपचे सक्रिय नगरसेवक तथा पक्षाचे निष्ठावान नेते विजय (शीतल) शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. पक्षातील त्यांच्या दीर्घकाळची निष्ठा, सामाजिक कार्य आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर या नव्या व महत्त्वपूर्ण जबाबदारीची धुरा सोपवली आहे.
विजय उर्फ शीतल शिंदे यांनी यापूर्वी महापालिकेत विविध पदांवर काम करत पक्षाच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातीलभाजपचे संघटन अधिक तळागाळापर्यंत मजबूत होईल, तसेच आगामी राजकीय व सामाजिक उपक्रमांना अधिक गतिशीलता प्राप्त होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या महत्त्वपूर्ण नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळातून आणि विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या नव्या कार्यकाळात पक्षाची पकड शहरात अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




