पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

इंधन बचतीच्या नावाखाली महापौर व आयुक्तांसाठी आलिशान नवीन गाड्या

अन्य पदाधिकाऱ्यांसाठी गाडी खरेदीचा रस्ता मोकळा

Spread the love

पिंपरी : (लोकजागृती )खर्चात बचत करावी अशी वल्गना करणाऱ्या सत्ताधारी भाजपकडून निव्वळ घोषणाबाजीच केली जाते. हे महापौरांसाठी तब्बल तीस लाखांची आणि आयुक्तांसाठी तब्बल 19 लाखांची आलिशान गाडी खरेदी करण्याच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. आता नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची रांग लागणार आहे हे यावरून स्पष्ट होणार आहे.

स्थायी समितीच्या बुधवार 17 जून रोजी झालेल्या बैठकीत वाहन खरेदी सह विकास कामांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि आयुक्त यांच्यासाठी नवीन गाड्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या तरी देखील इंधन बचतीच्या नावाखाली नवीन वाहन खरेदी केली जात आहे. आयुक्त आणि महापौर यांच्यासाठी दोन आलिशान गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. महापौर रवी लांडगे यांच्यासाठी महिंद्रा एक्स इव्ही 95 थ्री अबाव्ह बी. 79 आर 18.7 स्टार सी 11 ही इलेक्ट्रिक आलिशान गाडी निविदा न मागवता थेट पद्धतीने 29 लाख 35 हजार 367 रुपयाला खरेदी करण्यात आली. या गाडीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी व वाहन विमा करण्यासाठी पंधरा हजार दोनशे रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासाठी टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस हायब्रीड व्ही एक्स 7 सी या ब्रँडची 18 लाख 80 हजार 721 रुपये किंमतीची आलिशान गाडी खरेदी करण्यात आली आहे. ही गाडी देखील निविदा न मागवता थेट पद्धतीने खरेदी करण्यात आली आहे. या गाडीच्या वाहन नोंदणी व वाहन विम्यासाठी पंधरा हजार दोनशे रुपये खर्चास स्थायी समितीने आयत्या वेळी मान्यता दिली आहे. यापुढे महापालिकेचे अन्य पदाधिकारी,दहा क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष भविष्यात नवीन गाड्या घेण्यासाठी प्रयत्नशील राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button