पिंपरी चिंचवड

हिंजवडी फेज-२ येथील पीएमआर-५ मेट्रो स्थानकाची पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

प्रवाशांच्या सुविधा, फिडर सर्व्हिस आणि आपत्कालीन सुरक्षा यंत्रणेवर विशेष भर; PITCMRL ला गुणवत्तेबाबत महत्त्वाच्या सूचना

Spread the love

पुणे (लोकजागृती न्यूज):पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी मॅन-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ वरील ‘पीएमआर-५’ स्थानकाच्या प्रत्यक्ष जागेला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

हिंजवडी फेज-२ मधील आयटी प्रोफेशनल्स आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची संभाव्य गर्दी व प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन, या पाहणीदरम्यान प्रामुख्याने खालील बाबींवर भर देण्यात आला:

प्रवासी सुविधा आणि आधुनिक तिकीट प्रणाली: प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि सुलभ तिकीट प्रणाली उपलब्ध करण्याच्या तयारीची पाहणी करण्यात आली.

फिडर लास्ट-मईल सर्व्हिस:आयटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांपर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचता यावे, यासाठी कार्यक्षम ‘फिडर लास्ट-मईल सर्व्हिस’ सुरू करण्यावर भर देण्यात आला.आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा उभारणीच्या कामाची पाहणी करण्यात आली.

प्रवाशांची सोय आणि सुलभता लक्षात घेऊन या प्रकल्पाचे काम उच्च गुणवत्तेने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा महत्त्वाच्या सूचना PITCMRL’(पिटिसीएमआरएल) ला यावेळी देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यादरम्यान पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प विभाग) रिनाज पठाण, प्रभारी उपकार्यकारी अभियंता अभिमान भोसलेयांच्यासह पीएमआरडीए, टाटा प्रोजेक्ट्स आणि स्वतंत्र अभियंत्यांचे (Independent Engineers) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button