पिंपरी चिंचवड

Spread the love

**पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिक्षकांची दांडी; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!**

 

* **कमला नेहरू प्राथमिक शाळेत अपुरे शिक्षकबळ आणि मुख्याध्यापकांची अनुपस्थिती उघड**

* **दोनच खोल्यांत भरतायत १ ली ते ७ वीचे वर्ग**

* **विद्यानिकेतन शाळेत समायोजन करण्याची नगरसेविका प्रियांका कुदळे यांची आयुक्तांकडे मागणी**

 

—

 

**पिंपरी (विशेष प्रतिनिधी) :**

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील कमला नेहरू प्राथमिक शाळा (मुले-मुली क्र. ४/२) येथे मुख्याध्यापकांसह शिक्षकांची अनुपस्थिती आणि अत्यंत अपुऱ्या शिक्षकबळामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी नगरसेविका प्रियांका सुनील कुदळे यांनी शाळेला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. या गंभीर निष्काळजीपणाबाबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सखोल चौकशी करून तातडीने लेखी अहवाल सादर करावा, अशी जोरदार मागणी नगरसेविका प्रियांका कुदळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

### **विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर**

 

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. “शिक्षकांच्या या अशा अनुपस्थितीत लहान मुलांची देखरेख कोणी करायची? शाळेत एखादी वैद्यकीय आणीबाणी किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील?” असा संतप्त सवाल प्रियांका कुदळे यांनी उपस्थित केला आहे. गैरहजर शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अनुपस्थितीची सखोल चौकशी करून त्यांच्या उपस्थिती पुस्तकाची (मस्टर) तात्काळ तपासणी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

### **दोनच खोल्यांत सात वर्गांचा गाडा**

 

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी मिळून एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, पाहणीवेळी धक्कादायक वास्तव समोर आले—

 

* **पहिली ते चौथी** चे विद्यार्थी एकाच वर्गात बसवण्यात आले होते.

* **पांचवी ते सातवी** चे विद्यार्थी दुसऱ्या वर्गात बसवण्यात आले होते.

 

एकाच शिक्षकावर पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आल्यास प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तरानुसार मार्गदर्शन करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अशक्यप्राय आहे. प्रशासनाच्या या नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे कुदl1oo:

१चौकशी व अहवाल :१२ ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीबाबत तातडीने चौकशी करून त्याचा सविस्तर लेखी अहवाल आयुक्तांनी शिक्षकांची नियमित उपस्थिती, विद्यार्थ्यांची सुरक्षा, अपुऱ्या शिक्षकबळावर तात्काळ उपाययोजना आणि इयत्तानिहाय स्वतंत्र अध्यापनाची व्यवस्था करावी.

३. शाळेचे समायोजन : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कमला नेहरू प्राथमिक शाळेतील सर्व ३५ विद्यार्थ्यांचे पिंपरी-वाघेरे येथील **’विद्यानिकेतन शाळेत’** समायोजन करण्याच्या प्रस्तावावर प्राधान्याने विचार करून प्रशासकीय कार्यवाही करावी.

“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना सुरक्षित व गुणवत्तेचे वातावरण उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी करून प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करावा.”

प्रियांका सुनील कुदळे(नगरसेविका, प्रभाग क्र. २१)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button