वाढदिवसानिमित्त अनोखा आदर्श उपक्रम! आमदार अमित गोरखे यांच्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ५१ हजारांचा मदतीचा हात


पिंपरी-चिंचवड:(लोकजागृती )वाढदिवसाचा खरा आनंद समाजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवण्यात आहे. वाढदिवस हा केवळ शुभेच्छा आणि सत्काराचा दिवस नसून, समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे, असा प्रेरक संदेश देत विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक आदर्श व संवेदनशील उपक्रम राबवला आहे. वाढदिवसाच्या फराळावर किंवा भव्य स्वागतावर होणारा खर्च टाळून, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश नुकताच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
संकट काळात बळीराजाला खंबीर आधारसध्या राज्यातील काही भागांत शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करत आहेत. अशा बिकट परिस्थितीत बळीराजाला धीर देणे आणि त्याला आर्थिक आधार देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे, अशी ठाम भूमिका आमदार अमित गोरखे यांनी या प्रसंगी मांडली. मंत्रालयात झालेल्या या सदिच्छा भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोरखे यांच्या या संवेदनशील व लोककल्याणकारी निर्णयाचे मनापासून कौतुक केले. राजकीय व सामाजिक क्षेत्रात वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणी असे लोकोपयोगी उपक्रम राबवणे इतर कार्यकर्त्यांसाठी व नेत्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
जनतेची सेवा हेच ध्येयया उपक्रमाबाबत बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, “संकटाच्या काळात आपल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे, हे मी माझे सामाजिक कर्तव्य मानतो. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याची परतफेड समाजसेवा करूनच करणे हे माझे मुख्य ध्येय आहे.”सर्वत्र कौतुकाचा वर्षावआमदार अमित गोरखे यांच्या या स्तुत्य उपक्रराबद्दल पिंपरी-चिंचवड शहर तसेच संपूर्ण राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, हा उपक्रम इतर राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक नवा आदर्श घालून देणारा ठरला आहे.




