दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार शंकर जगतापांचा पुढाकार; ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स ११ लाखांचा धनादेश सुपूर्द


पिंपरी (विशेष प्रतिनिधी): लोकजागृती
राज्यात पावसाने अचानक दडी मारल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि त्यामुळे शेतीचे झालेले अतोनात नुकसान या पार्श्वभूमीवर संकटातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी चिंचवडचे **आमदार शंकर जगताप** आणि चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे **विजुशेठ जगताप** यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक जाणिवेतून जगताप यांच्या वतीने **‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी ११ लाख रुपयांचा धनादेश** राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी दुष्काळ ही अत्यंत बिकट समस्या असते. पिकांचे नुकसान, घटते उत्पन्न आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीचा आधार देणे आवश्यक आहे. याच भावनेतून ही मदत करण्यात आल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
यावेळी ॲड. सखाराम कोळसे पाटील, निलेश पवार, प्रवीण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मदतकार्य सुरूच राहणार पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक गरजू व होतकरू कुटुंबांना शैक्षणिक तसेच वैद्यकीय कारणांसाठी आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून नेहमीच आर्थिक मदत केली जाते. मात्र, यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दुष्काळग्रस्तांसाठीचे हे मदतकार्य अविरतपणे सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. मात्र, दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडतात. अशा काळात ‘आपण एकटे नाही, तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’ हा विश्वास शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. याच भावनेतून आम्ही ११ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार समाजातील प्रत्येक घटकाला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहे.”




