पिंपरी चिंचवड

एक पिढी धडविण्यासाठी शिक्षकी पेशात येण्याचे डॉ . राजेंद्र कांकरिया यांचे आवाहन

विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम

Spread the love

 

चिंचवड, ता. ६ : (लोकजागृती )शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयात ‘एक दिवस विद्यार्थ्यांचा’ हा अनोखा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापकांची भूमिका पार पाडली

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयात हा उपक्रम घेण्यात आला. सकाळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडे पदभार सोपवण्यात आला

यामध्ये कु. मुस्कान शेख हिने एक दिवसाची प्राचार्या, कु. जेसिका शर्मा हिने उपप्राचार्या, तर ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध विभागांचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. विद्यार्थी प्राध्यापकांनी वर्गावर जाऊन तासिका घेतल्या, प्रात्यक्षिके घेतली आणि विद्यार्थ्यांच्या शंका सोडवल्या. तर विद्यार्थी प्राचार्यांनी दिवसभर महाविद्यालयाचे प्रशासन, शिस्त आणि शैक्षणिक कामकाजाचे नियोजन पाहिले

आपल्या मनोगतात विद्यार्थी प्राचार्या मुस्कान शेख म्हणाली, “एक दिवस जरी असले तरी प्राचार्य पदाची जबाबदारी किती मोठी आहे, हे आज समजले. प्राध्यापकांना वर्ग सांभाळताना किती मेहनत घ्यावी लागते, याची जाणीव झाली.” यावेळी विद्यार्थी प्राध्यापकांनीही आपल्या भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, स्टाफ अकॅडमीच्या समन्वयिका डॉ. जयश्री कांबळे, प्रा. स्नेहल वऱ्हाडे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन विद्यार्थी प्राध्यापकांचा खास सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी शिक्षकांचे महत्त्व विषद केले, तर मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगून मार्गदर्शन करताना भविष्यात आदर्श शिक्षकी पेशा स्वीकारण्याचे आवाहन शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांना केले. तुमच्यात आत्मविश्वास , प्रामाणिकपणा , विद्यार्थ्याप्रती आदर हे गुण असतील तर ते अंगीकारून शिक्षकी पेक्षा भविष्यात स्वीकारावा . कारण शिक्षक हा एक पिढी धडवत असतो . चांगल्या शिक्षकांची आजही खूप गरज आहे असे सांगुन नुकताच आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आलेले महाराष्ट्रातील डॉ . कविता गित्ते , सीमा शिंदे , कुंदा बच्छाव याची सखोल माहीती उपस्थितांना दिली .

समारोप प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य व गणेश वंदना सादर केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रियंका गंगावणे यांनी केले, सूत्रसंचालन विद्यार्थिनी सरस्वती जोशी हिने केले, तर आभार विद्यार्थी उपप्राचार्या जेसिका शर्मा हिने मानले. यावेळी सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—फोटो ओळ :विद्यार्थी प्राचार्या, उपप्राचार्या, प्राध्यापकांसमवेत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. जयश्री कांबळे व प्रा. स्नेहल वऱ्हाडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button