पिंपरी चिंचवड

कुणाच्या आयुष्यात प्रकाशाचा दीप उजळणे हीच खरी आदरांजली’ – माजी नगरसेवक राजेंद्र जगताप

Spread the love

पिंपरी (लोकजागृती न्यूज):महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगवी येथे एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्व. गणपतराव जगताप प्रतिष्ठान आणि श्री लक्ष्मण नागरी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, यामध्ये तब्बल २१५ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक जाणीव जोपासली.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ॲड. अभिषेक जगताप यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून दादांच्या स्मृतींना अभिवादन केले.

“रक्तदान हेच सच्ची आदरांजली”

यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले, “अजितदादांना खरी आदरांजली वाहायची असेल, तर कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाशाचा दीप उजळला पाहिजे, याच भावनेतून आम्ही सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात या रक्तदान शिबिराचे आयोजन केले. विशेष म्हणजे, पावसाचे वातावरण असताना आणि सुट्टीचा दिवस असूनही केवळ दादांवरीलगाढ प्रेमापोटी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत रक्तदान केले.”

या कार्यक्रमास माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा साळवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे, नगरसेवक जितेंद्र ननवरे, बबनराव गाढवे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, अंबरनाथ कांबळे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फजल शेख, दीप्ती कांबळे, उज्ज्वला ढोरे, अतुल शितोळे, अरुण पवार, तानाजी जवळकर, महादेव रोकडे, उद्धव ववले यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. अजितदादांच्या विचारांना आणि समाजसेवेच्या वसाहतीला साजेसा असा हा रक्तदान सोहळा सांगवी परिसरात अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button