स्वातंत्र्यदिनानिमित्त निगडीतील ‘भक्ती-शक्ती’ परिसरात राष्ट्रभक्तीचा अनोखा जागर!
सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर झाला भारावून गेला


पिंपरी-चिंचवड, १५ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून निगडी येथील ऐतिहासिक भक्ती-शक्ती’ परिसरात आयोजित विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण शहरात अफाट राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. ‘Youvan’ संस्था आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकायांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन तसेच महापालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी आवर्जून उपस्थित राहून सहभाग नोंदवला आणि उपस्थितांचा उत्साह वाढवला.
ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे अमर गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशवासीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि क्रांतीची ज्वाला जागविणारे मुख्य प्रेरणागीत ठरले होते. स्वातंत्र्य चळवळीच्या प्रत्येक टप्प्यावर या गीताने लक्षावधी देशवासीयांना एकाच सूत्रात बांधत मातृभूमीप्रती असीम समर्पणाची भावना दृढ केली. याच ऐतिहासिक वारशाचे स्मरण नव्या पिढीमध्ये ताजे राहावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व कर्तव्यभावना वृद्धिंगत व्हावी, या उदात्त हेतूने या सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील नागरिक, तरुण वर्ग आणि विद्यार्थी यांच्या प्रचंड सहभागातून ‘वंदे मातरम्’चे देशभक्तीपर स्वर संपूर्ण भक्ती-शक्ती परिसरात दुमदुमले. या सुंदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महापौर रवि लांडगे यांनी ‘Youvan’ संस्थेचे पदाधिकारी, सर्व स्वयंसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केल.
याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात विविध गुणवान कलाकारांनी राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, महापालिकेतील खडतर प्रशासकीय व दैनंदिन जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असतानाच आपली संगीत आणि गायनाची कला जोपासणाऱ्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात उत्साहात सहभाग घेतला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल महापौर लांडगे यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
या सोहळ्यात बालकलाकार वंडर बॉय’ पृथ्वीराज सतीश इंगळेयाने सादर केलेले मेरा जूता है जापानी हे सदाबहार गीत कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. त्याच्या अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाला उपस्थित सर्व नागरिकांनी व मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली. महापौर रवि लांडगे यांनी लहानग्या पृथ्वीराजचे विशेष कौतुक करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील कलाप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
स्वातंत्र्यदिन हा केवळ सण नसून आपल्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत त्याग आणि बलिदान देणाऱ्या समस्त ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक स्वरांतून आपले राष्ट्रप्रेम, अखंड एकात्मता आणि मातृभूमीप्रती असलेली अचल निष्ठा स्पष्टपणे अधोरेखित होते. नव्या पिढीच्या मनामध्ये केवळ राष्ट्रप्रेमच नव्हे, तर देशाच्या आणि शहराच्या राष्ट्रविकासातील आपली स्वतःची जबाबदारी काय आहे, याची जाणीव दृढ होण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन अत्यंत आवश्
या प्रेरणादायी आणि देशभक्तीमय सोहळ्यास आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य पंकज भालेकर, अतिश बारणे, जनता व संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह ‘Youvan’ संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महानगरपालिकेचे विविध अधिकारी-कर्मचारी, नामवंत कलाकार, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या दोन्ही शानदार उपक्रमांतून अस्सल राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि तरुण पिढीचा सक्रिय सहभाग यांचा एक अत्यंत प्रभावी संगम पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळाला.




