आमदार उमाताई खापरे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून घसघशीत कार्यक्रमाची मेजवानी
रंग माझा वेगळा'च्या सुरेल मैफलीने आणि विक्रमी उपस्थितीत 'नारीशक्ती महोत्सव २०२६' चा दिमाखदार सांगता सोहळा संपन्न!


पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; आमदार उमाताई खापरे यांच्या पुढाकाराने सोहळ्यास अभूतपूर्व यश**
चिंचवड, ३० जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज)
महाराष्ट्र शासन आणि आमदार उमाताई खापरे यांच्या विशेष पुढाकारातून पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित ‘नारीशक्ती महोत्सव २०२६’ चा ग्रँड फिनाले आणि सांगता सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या महोत्सवाच्या अंतिम दिवशी महिला सक्षमीकरणाचा संदेश देत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचा भव्य समारोप सोहळा पार पडला.
यावेळी महिलांच्या योगदानाचा गौरव करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाचा आणि दूरदृष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे महिलांना शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. विशेषतः मोफत व्यावसायिक शिक्षण आणि’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांसारख्या कल्याणकारी योजनांमुळे महिलांचा आत्मविश्वास उंचावला असून त्या प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे पुढे येत आहेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्यास महसूल व उच्च शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांसह स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती लाभली होती. व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार शंकरभाऊ जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, अश्विनी जिचकर, प्रणिता चिखलीकर रोहिणी नायडू (नाशिक) सोनाली कुलकर्णी (नाशिक), कविता देशमुख (मुंबई) शीतल तोंडलीकर (कल्याण), मा. रिदा रशीद (मुंबई), गायत्री राऊत (कोल्हापूर)वर्षा डहाळे, नीलम गोंधळी (कोकण),रेखा कुलकर्णी, संध्या देशमुखनगरसेविका अनुराधाताई गोरखे, ॲड. वर्षाताई डहाळे, डॉ. संजीवनी पांडे, सदाशिव खाडे, जयदीप खापरे, प्रवीण तुपे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या आणि विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खालील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला:
या महोत्सवाचे आणि नियोजनबद्ध आयोजनाचे श्रेय चिंचवड मंडलाचे अध्यक्ष श्री. जयदीपदादा खापरे यांना जाते, ज्यांनी आपल्या सहकार्यांसह या सोहळ्याचे अतिशय नेटके नियोजन केले. तसेच श्री. मोरेश्वर शेंडगे, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, नगरसेवक कैलास कुटे, मंदार देशपांडे, सुरेश भोईर, राहुल कलाटे, प्रभाकर वाघेरे, ऋषिकेश वाघेरे, नीताताई कुशारे, अनिताताई वाळुंजकर, जागृतीताई खापरे, अमर कापसे, रवींद्र देशपांडे, प्रवीण तुपे (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोशल फाउंडेशन), आशाताई काळे आणि गीताताई महिंद्रू आदींनी संयोजन व उपस्थितीद्वारे कार्यक्रम यशस्वी केला

केतकी माटेगावकर यांच्या सुरांनी संध्याकाळ केली अविस्मरणीय
समारोपाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘रंग माझा वेगळा’ या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर यांनी आपल्या सुरेल आवाजात मराठी गीतं आणि भावगीतांची सुंदर मैफल सादर केली. त्यांच्या मनमोहक सादरीकरणाने संपूर्ण सभागृह सुरांच्या आनंदात न्हाऊन निघाले. रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येक गीताचा मनमुराद आनंद लुटला. संगीत, संस्कृती आणि आनंदाचा हा संगम पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

—




