पिंपरी चिंचवड

पिंपरीत १५ ऑगस्ट रोजी भव्य युवा मेळावा आणि रोजगार जनजागृती आंदोलन

सनय छत्रपती शासन पक्ष व विविध सामाजिक संघटनांचे आयोजन; पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सकाळी १० वाजता होणार आंदोलन

Spread the love

 

पिंपरी (लोकजागृती न्यूज):

“देशात आज घरोघरी बेरोजगारी पसरल्यामुळे देशाच्या प्रगतीला घरघर लागली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक तरुणाला रोजगाराची हक्काची संधी उपलब्ध करून देण्यासाठी यंदाचा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे. जेव्हा प्रत्येकाच्या हाताला काम असेल, प्रत्येक माणूस दारिद्र्यरेषेच्या बाहेर येईल आणि प्रत्येक नागरिकाला शिक्षण व रोजगाराची समान संधी मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचे समाधान लाभेल,” असा जोरदार संदेश देत पिंपरीत एका विशेष आंदोलनाची व मेळाव्याची हाक देण्यात आली.

बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आणि युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी **येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता, पिंपरी महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ** एका भव्य युवा मेळाव्याचे व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

“चला, तरुणांनो… आता एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन करत या कार्यक्रमाचे आयोजन सनय छत्रपती शासन पक्ष तसेच या देशातील इतर सर्व समविचारी पक्ष, सामाजिक संस्था, संघटना आणि विविध सार्वजनिक मंडळांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय पक्षप्रमुख प्रा. नामदेवराव जाधव  हे असणार असून, अधिक माहितीसाठी ९८६०६०१२५०या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

देशातील वाढती बेरोजगारी संपवून युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी या स्वातंत्र्यदिनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन समस्त तरुणवर्ग व नागरिकांना करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button