पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये १६ व्या ‘हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप’ स्पर्धेचा थरार रंगणार!

१२ ते २३ ऑगस्टदरम्यान नेहरूनगरच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा; बुधवार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

Spread the love

पिंपरी, ११ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ‘१६ व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा १२ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे होणार आहे. स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या, बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी दिली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास अनेक नामवंत केंद्रीय व राज्यस्तरीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार.

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, तसेच खासदार मेधा कुलकर्णी, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे आणि डॉ. अमोल कोल्हे. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, डॉ. निलम गोऱ्हे, अमित गोरखे, विक्रम काकडे आणि शंकर मांडेकर,तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष रेखा देवकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, मनिषा लांडे, वर्षा जगताप, योगेश बहल यांच्यासह महापालिकेचे सर्व प्रभाग अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे तसेच इतर सर्व नगरसदस्य, नगरसदस्या व महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून येणाऱ्या युवा महिला हॉकीपटूंना राष्ट्रीय स्तरावर आपले क्रीडाकौशल्य सिद्ध करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडाप्रेमी, तरुण खेळाडू आणि नागरिकांना उच्च दर्जाच्या व अटीतटीच्या हॉकी सामन्यांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

शहरात होत असलेल्या या भव्य क्रीडा महोत्सवामुळे क्रीडावर्तुळात प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button