पिंपरी चिंचवड

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अध्यक्ष कामगारनेते यशवंतभाऊ भोसले कंबर कसून मैदानात! 

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा

Spread the love

 

पिंपरी-चिंचवड(लोकजागृती )पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, आज (दि.२१) पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “गेल्या १८ वर्षांपासून आमची संघटना महानगरपालिका

कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आम्ही पूर्ण ताकतीने काम करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी संघटना सदैव तत्पर आहे.” मेळाव्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, ज्यावर यशवंतभाऊ भोसले यांनी सविस्तर चर्चा करून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत, आगामी काळातही त्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मोठ्या संख्येनेमहानगरपालिकेतील सभासद कर्मचारी उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button