पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील बिजलीनगर चौकात भाजप नगरसेवकांच्या बॅनरबाजीवरून वाद; नियमभंग होऊनही प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

विनापरवाना फ्लेक्स व जाहिरातबाजीमुळे सार्वजनिक शिस्त धोक्यात; प्रशासनाच्या दुजाभावावर नागरिकांमधून तीव्र संताप

Spread the love

 

oplus_1056

पिंपरी-चिंचवड, ३० सप्टेंबर २०२६ (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रतिष्ठीत परिसर असलेल्या बिजलीनगर येथील मुख्य चौकात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थानिक नगरसेवकांच्या वतीने आगामी रोजगार मेळाव्याचे मोठ्या प्रमाणावर बॅनर्स  लावण्यात आले आहेत. मात्र, हे बॅनर्स लावताना महापालिकेच्या अधिकृत परवानगीचे व नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, यामुळे थेट नियमभंग आणि आचारसंहिता वा विहित नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, उघडपणे नियमबाह्य स्वरूपात लावण्यात आलेल्या या बॅनरबाजीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सार्वजनिक चौकात विनापरवाना फ्लेक्सचा सुळसुळाट

शहरातील प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणे विद्रूप करण्यास प्रतिबंध असतानाही, बिजलीनगर चौकात राजकीय पुढारी व नगरसेवकांच्या नावाखाली अनधिकृतपणे झळकलेल्या या जाहिरातबाजीतून नियमांची पायमल्ली होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा चौकांमध्ये असे फलक लावण्यापूर्वी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असते, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते. मात्र, या नियमांना हरताळ फासून हे बॅनर्स लावण्यात आल्याचे स्पष्ट होते.

सामान्य नागरिकांनी किंवा छोट्या व्यावसायिकांनी अशा प्रकारे अनधिकृत बॅनर्स किंवा फलक लावल्यास महापालिका प्रशासन तात्काळ कारवाई करत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारते. मात्र, सत्ताधारी पक्षाशी संबंधित नगरसेवकांनी किंवा नेत्यांनी नियम मोडल्यास पालिका प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि विरोधकांकडून केला जात आहे. प्रशासनाची ही नरमाईची भूमिका दुजाभावाची असून, राजकीय दबावापोटी कारवाई टाळली जात असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

तातडीने कारवाईची मागणी शहरात कायदा आणि नियमांचे पालन सर्वांसाठी समान असले पाहिजे. प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता बिजलीनगर चौकातील हे अनधिकृत बॅनर्स तात्काळ काढून टाकावेत आणि नियमभंग करणाऱ्या संबंधित नगरसेवकांवर व आयोजकांवर नियमानुसा र करण्यात यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button