पिंपरी चिंचवड

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले पाच जिल्ह्यांच्या तीन दिवसीय कामगार संपर्क दौऱ्यावर!

Spread the love

पिंपरी (लोकजागृती ) दिनांक २६ जून २०२६:– राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले हे शनिवार, दि. २७ जून २०२६ ते सोमवार, दि. २९ जून २०२६ या कालावधीत राज्यव्यापी कर्मचारी व कामगार संपर्क दौऱ्यावर असणार आहेत. दौंड, कुरकुंभ एमआयडीसी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ते पाच जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.अन्यायग्रस्त संघटित व असंघटित कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

दौऱ्याची रूपरेषा:

१) शनिवार, दि. २७ जून २०२६

– सकाळी ११.३० वा. पिंपरी-चिंचवड येथून प्रस्थान.

– दुपारी २.३० वा. दौंड-कुरकुंभ एमआयडीसी येथे कामगार व व्यवस्थापन प्रतिनिधींची संयुक्त बैठक.

– दुपारी ३.३० ते ४.३० वा. कर्मचारी व कामगार संपर्क मेळावा तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद.

सायंकाळी ४.३० वा. पंढरपूरकडे प्रस्थान.

– रात्री पंढरपूर येथे मुक्काम.

२) रविवार, दि. २८ जून २०२६

– सकाळी १०.०० वा. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सभागृह, रविवार पेठ, सोलापूर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यकारिणीची बैठक व कर्मचारी मेळावा.

– दुपारी १२.३० वा. तुळजापूरकडे प्रस्थान.

– दुपारी २.०० वा. श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन. त्यानंतर तुळजापूर देवस्थानातील कर्मचारी व अधिकारी यांच्यासमवेत मा. सहाय्यक कामगार आयुक्त, लातूर यांच्या आदेशाच्या अनुषंगाने कर्मचारी प्रश्नांवर बैठक.

– दुपारी ३.०० वा. टाटा इन्स्टिट्यूट, तुळजापूर येथील कर्मचारी समितीसोबत बैठक.

– सायंकाळी ४.०० वा. लातूरकडे प्रस्थान.

– सायंकाळी ७.३० वा. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, लातूर येथील कर्मचारी कार्यकारिणी समितीची बैठक.

– बैठक संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान.

३) सोमवार, दि. २९ जून २०२६

– सकाळी १०.०० वा. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर येथे संघटनेच्या विधीतज्ज्ञ व अधिवक्त्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक.

– दुपारी ३.०० वा. हॉटेल अतिथी, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद.

– सायंकाळी ५.३० ते ८.०० वा. सिडको, ललित कला भवन येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासदांचा भव्य कर्मचारी मेळावा.

– रात्री ९.०० वा. पुण्याकडे प्रस्थान. 

या दौऱ्याच्या माध्यमातून कामगारनेते यशवंतभाऊ भोसले विविध औद्योगिक क्षेत्रांतील कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, कामगार, तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. प्रलंबित कामगार प्रश्नांवर कायदेशीर मार्गदर्शन, पुढील संघटनात्मक भूमिका आणि न्यायालयीन बाबींवर या दौऱ्यात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या उपक्रमामुळे कर्मचारी व कामगारांना आपले प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची आणि योग्य मार्गदर्शन मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button