पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘शहर अभियंता’ पदी मनोज सेठिया यांची पदोन्नती!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आदेश; शहरातील विकासकामांना मिळणार अधिक गती व तांत्रिक बळ

Spread the love

 

पिंपरी, १७ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सह शहर अभियंता (स्थापत्य)मनोज  सेठिया यांची महापालिकेच्या ‘शहर अभियंता’पदावर सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीयांनी जारी केला आहे.

महापालिका आस्थापनेवरील अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘शहर अभियंता’ पद गत २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रिक्त झाले होते. या रिक्त पदावरील पदोन्नतीसाठी गत १८ जून २०२६ रोजी विशेष पदोन्नती समितीची सभा पार पडली. या समितीने उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सेवाज्येष्ठता, आरक्षण, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व तसेच शिस्तभंगविषयक बाबींची कसून पडताळणी केली. या सर्व प्रक्रियेनंतर समितीने मनोज सेठिया यांच्या पदोन्नतीची एकमुखाने शिफारस केली होती. तसेच, महापालिका सभा ठराव क्र. ४४ (दिनांक २७ जानेवारी २०२६) अन्वयेही त्यांच्या पदोन्नतीस आधीच मान्यता देण्यात आली होती.

ही पदोन्नती संबंधित न्यायालयीन प्रकरणे, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका, तसेच संबंधित शासन निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित रिट याचिकांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रदान करण्यात आले.

मनोज सेठिया यांनी ‘शहर अभियंता’ पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील सुरू असलेल्या आणि आगामी विकासकामांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम दिशा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच महापालिकेच्या स्थापत्यविषयक कामकाजात प्रभावी समन्वय साधला जाऊन कामांचा वेग वाढेल, अशी तीव्र अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या तांत्रिक व पायाभूत विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button