पिंपरी चिंचवड

शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती!

खनिजबाधित भागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार - आमदार शंकर जगताप

Spread the love

 

पिंपरी, ५ सप्टेंबर २०२६ (लोकजागृती न्यूज):

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF), पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेने जारी केली.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच ११ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेतील तरतुदींनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर खाणकामामुळे बाधित भाग आणि तेथील नागरिकांच्या विकासासाठी धोरण ठरविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते.

प्रतिष्ठानचा वार्षिक कृती आराखडा व अर्थसंकल्प मंजूर करणे, विकासकामांना मान्यता देणे, निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होत असल्याची खात्री करणे, कामांचा वेळोवेळी आढावा घेणे तसेच वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षित खात्यांना मंजुरी देणे, ही या परिषदेची प्रमुख कामे आहेत. जिल्हा खनिज अधिकारी तथा सदस्य सचिव आनंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे नियुक्तिपत्र जारी केले आहे.

आमदार शंकर जगताप यांची प्रतिक्रिया

या नियुक्तीबद्दल बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की,

> “जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून मिळालेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. खनिजबाधित भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा, यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करेन.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button