पिंपरी चिंचवड

चिंचवडमधील ‘निरामय हॉस्पिटल’ सील करण्याची एलआयसीची कारवाई; १०० ते १५० कामगारांचा परिसरात जमाव

कर्ज प्रकरणावरून एलआयसी प्रशासनाची मोठी कारवाई; रुग्णालयाच्या भवितव्याबाबत व रुग्णांच्या सुरक्षेबाबत अनिश्चितता

Spread the love

पिंपरी-चिंचवड, सप्टेंबर२०२६(लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकित आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणाऱ्या चिंचवडमधील ‘निरामय हॉस्पिटल’ (Niramaya Hospital) संदर्भात एक मोठी व खळबजनक बातमी समोर आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) वतीने या रुग्णालयाची इमारत सील करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

काय आहे नेमका प्रकार?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, निरामय हॉस्पिटलवर एलआयसीचे मोठे कर्ज असून, ते थकीत राहिल्यामुळे किंवा आर्थिक व्यवहारांच्या तांत्रिक कारणास्तव एलआयसी प्रशासनाकडून ही सील करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. एलआयसीच्या पथकाकडून हॉस्पिटल परिसरात ही प्रक्रिया सुरू असतानाच, अचानक घडलेल्या या घडामोडीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

१०० ते १५० कामगारांचा व कर्मचाऱ्यांचा जमाव,हॉस्पिटल सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजताच निरामय हॉस्पिटलमधील तब्बल १०० ते १५० कामगार, कर्मचारी आणि संबंधितांनी तातडीने हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी करत जमाव जमवला. अचानक हॉस्पिटलवर सील करण्याची कारवाई निघाल्यामुळे आमचा रोजगार आणि भविष्याचा प्रश्न निर्माण होईल, तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे व नोकरीचे काय असा प्रश्न उपस्थित करत कामगारांनी चिंता व्यक्त केली.

रुग्णसेवेवर आणि उपचारांवर प्रश्नचिन्ह?

निरामय हॉस्पिटल हे पिंपरी-चिंचवड परिसरातील एक प्रमुख मल्टिस्पेशालिटी आणि सर्वसामान्यांना परवडणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. याआधीही या हॉस्पिटलच्या आर्थिक व कर्जाच्या प्रकरणाबाबत चर्चा रंगली होती. अशा प्रकारे अचानक कारवाई झाल्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या गंभीर व आयसीयू (ICU) मधील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासकीय कारवाई आणि कामगारांचा वाढता जमाव यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.

घटनास्थळावर पोलीस व संबंधित यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, या कर्ज प्रकरणावर व सील करण्याच्या कारवाईवर अंतिम निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button