पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर दुर्घटना :उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Spread the love

पिंपरी (लोकजागृती )पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी (Moshi) भागात एक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सुमारे १० ते १२ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल (Fire Brigade) आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाजात समोर आले आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवा यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना संपर्क साधला आणि दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या तसेच जखमी झालेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

गरज पडल्यास लष्कराला पाचारण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button