पिंपरी चिंचवड

विधानमंडळ महिला हक्क आणि अधिकार समितीची घोषणा; अध्यक्षपदी मा. डॉ. निलम गोऱ्हे यांची निवड

Spread the love

मुंबई/पुणे (लोकजागृती न्यूज):

महाराष्ट्र विधिमंडळांतर्गत महिलांच्या हक्क, अधिकार आणि सुरक्षेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ‘महिला हक्क आणि अधिकार समिती’ ची पुनर्रचना करण्यात आली असून, या समितीची अधिकृत रचना जाहीर करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य मा. डॉ. (श्रीम.) निलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या महिला विधानपरिषद आणि विधानसभा सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, समितीची रचना खालीलप्रमाणे आहे:

१. मा. डॉ. (श्रीम.) निलम गोऱ्हे (विधानपरिषद सदस्य) – अध्यक्ष

२. मा. डॉ. (श्रीम.) प्रज्ञा सातव (विधानपरिषद सदस्य) – सदस्य

३. मा. श्रीमती भावना गवळी (विधानपरिषद सदस्य) – सदस्य

४. मा. श्रीमती चित्रा वाघ (विधानपरिषद सदस्य) – सदस्य

५. मा. श्रीमती उमा खापरे (विधानपरिषद सदस्य) – सदस्य

६. मा. डॉ. मनिषा कायंदे (विधानपरिषद सदस्य) – सदस्य

७. मा. श्रीमती स्नेहा दुबे-पंडित (विधानसभा सदस्य, वसई) – सदस्य

८. मा. श्रीमती श्वेता महाले (विधानसभा सदस्य) – सदस्य

राज्यभरातील महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अन्याय, महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच महिलांच्या हक्कांसंबंधीच्या विविध प्रकरणांचा आढावा घेण्याचे काम या समितीद्वारे केले जाणार आहे. महिलांशी संबंधित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती विधिमंडळ स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या नव्या समितीकडून महिला वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button