पिंपरी चिंचवड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन

उपमहापौर शर्मिला बाबर व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; लोककल्याणकारी विचारांचे स्मरण

Spread the love

पिंपरी, १० सप्टेंबर २०२६ (लोकजागृती न्यूज):

“राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रजेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून न्याय, प्रशासन आणि सामाजिक सुधारणांना नेहमी महत्त्व दिले. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती आजही आदर्श मानली जाते. महिला नेतृत्व, लोककल्याण आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा उत्तम आदर्श त्यांनी निर्माण केला असून, त्यांच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यातून प्रेरणा घेणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी, पिंपरी येथील स्मारकास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी महापालिका भवनातील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसदस्य राजू दुर्गे,उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पडळकर , लक्ष्मण रुपनर, मुकुंद कुचेकर, दीपक भोजने, राहुल मदने, सोनाताई गडदे, भुजंग दुधाळे, माणिकराव बारगळ, शंकर दातीर, गणेश एकल, जयंत वायकुळे, रवींद्र कंकरे, सतीश खरात, वंदना धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच, सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ‘ह’ प्रभागाच्या अध्यक्षा तृप्ती कांबळे, प्रभाग अधिकारी संतोष कोराड, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष सचिन सरक यांच्यासह सूर्यकांत गोफणे, अभिमन्यू गाडेकर, अजय दूधभाते, नवनाथ बीडे, छगन वाघमोडे, कृष्णराव गिरगुणे, संदिपान सामसे, रमेश गाढवे, गिरीश देवकाते, ज्ञानेश्वर मडबळ, प्रा. गलांडे सर, बळीराम घोडके, महेंद्र लंबाते, नारायण भुरे, वाघमारे सर, अक्षय तिघाडे, भास्कर गाडेकर, अरविंद टेकाळे, हरिश्चंद्र गायके आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की,“अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि लोकसेवेचे उत्तम उदाहरण आहे. राज्यकारभार करताना त्यांनी प्रजेच्या सुख-दुःखाला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि समाजातील विविध घटकांच्या हिताचा विचार करून विकासाची दूरदृष्टी दाखवली. त्यांचे कार्य केवळ एका कालखंडापुरते मर्यादित नसून आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठीही अत्यंत मार्गदर्शक आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button