पिंपरी चिंचवड

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न

डब्ल्यूटीई’’ उद्योग समूहाकडून क्रांतिवीरांना विधायक श्रद्धांजली!

Spread the love

 

 

– तालसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेला साहित्याचे वाटप

 

पिंपरी-चिंचवड (लोकजागृती )’हुतात्मा दिना’च्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना डब्ल्यूटीई (WTE Infra Projects Pvt Ltd.) समूहाने विशेष अभिवादन केले. या सामाजिक उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले.

तालसवाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च माध्यमिक शाळेला डब्ल्यूटीई समूहाने पाच ब्रँडेड संगणक, तसेच विद्यार्थ्यांसाठी टेबल आणि खुर्च्या भेट दिल्या. डब्ल्यूटीई फाउंडेशनच्या संचालिका वेदिका भोळे यांनी हे साहित्य शाळेच्या सुपूर्त केले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, हे असल्याचे सांगितले.

पिंपरी येथील क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित शिवराय पाटील शिक्षण संकुल (थेरगाव) येथे विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. या शाळेला सहाय्य करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष भरत चव्हाण आणि माजी अध्यक्ष जगदाळे सर यांनी महत्वाचे सहकार्य केले.

सोहळ्यात शाळेला ७५ इंची अत्याधुनिक ‘इंटरॅक्टिव्ह पॅनल’, ७० वाकडी डेस्क आणि कुस्ती सरावासाठी दर्जेदार ‘रेसलिंग मॅट’ प्रदान करण्यात आले. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांची उपस्थिती लाभली, तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘क्रांतीगीताने’ सर्वांची मने जिंकली. डब्ल्यूटीईचे जनरल मॅनेजर (फायनान्स) विवेक जोशी आणि एच.आर. मॅनेजर कावेरी चव्हाण उपस्थित होत्या.

सामाजिक बांधिलकीचा संदेश:

डब्ल्यूटीई समूह नेहमीच पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहिले आहे. व्यवसायिक प्रगतीसोबतच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचवण्याचा हेतू या उपक्रमामागे असल्याचे संस्थेने सांगितले. शहराच्या उन्नतीसाठी इतर घटक आणि संस्था देखील अशा प्रकारच्या पुढाकारास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

“डब्ल्यूटीई समूहाच्या धोरणाचा भाग म्हणून, आम्ही ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण आणि क्रीडा साधनसामग्री पोहोचवण्यावर भर देतो. समाजाच्या विकासासाठी हा आमचा सततचा प्रयत्न आहे.

– सौ. वेदिका भोळे, संचालिका, डब्ल्यूटीई फाउंडेशन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button