पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांनी हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला

Spread the love

पिंपरी (लोकजागृती )चिंचवडमधील कामगार चळवळीतील ( Vinayak Chakre )झुंजार नेतृत्व आणि परखड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे कॉम्रेड विनायक गंगाधर चक्रे (वय ७९) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे संत तुकारामनगर येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. मात्र १९८०-९० च्या दशकात पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील कामगार चळवळीला त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय ठरले. बजाज ऑटो, टेल्को, बजाज टेम्पो, गरवारे नायलॉन्स आदी कंपन्यांतील कामगार आंदोलनात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. डेव्हिड ब्राऊन ग्रीव्हज कंपनीने त्यांना सेवेतून बडतर्फ केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ कामगार चळवळीत स्वतःला झोकून ( विनायक चक्रे) दिले.

शहरातील विविध लहान-मोठ्या उद्योगांतील वेतन करार, कामगारांच्या समस्या आणि हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. विविध संप व आंदोलनांमध्ये त्यांचा पुढाकार राहिला. पत्रकारितेतही त्यांनी ठसा उमटवत दैनिक सामना, लोकसत्ता आणि महाराष्ट्र हेराल्डमध्ये काम केले. लोकसत्तामध्ये ‘वरद विनायक’ या टोपणनावाने त्यांनी कामगार विषयक सदर चालवून विशेष ( Vinayak Chakre )ओळख निर्माण केली.

त्यांच्या निधनाने प्रखर, प्रामाणिक कामगार नेता, परखड पत्रकार आणि शहरातील कामगार चळवळीतील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. कॉम्रेड चक्रे सतत स्मरणात राहतील, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी व्यक्त केली.

दापोडी येथील ख्रिश्चन दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर ( Vinayak Chakre )आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती मिळो!

भावपूर्ण श्रद्धांजली!!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button