पिंपरी चिंचवड

सूरसम्राज्ञी’ आशा भोसले यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेर चा श्वास

भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचे आज निधन झाले.

Spread the love

मुंबई:.(लोकजागृती )वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या ९ व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. त्यांनी ८ दशकांहून अधिक काळ आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं.त्यामुळं या संगीतक्षेत्रातलं नक्षत्र हरपल्याची भावना व्यक्त होतेय. आशाताईंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.यांना शनिवारी श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीतविश्वावर, सिनेइंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, कधीही न भरून होणारी पोकळी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आशा भोसले यांचं पार्थिव उद्या, सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्यांच्या लोअर परेल इथल्या ‘कासा ग्रांडे’ निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर शासकीय  अंत्यसंस्कार करण्यात येतील.

20 हुन अधिक भाषांमध्ये 12000 हुन अधिक गाणी गायली आहेत हिंदी, मराठी किंवा इतर कोणतीही भाषा असो, त्यांचा आवाज सर्वत्र जादू निर्माण करणारा ठरला. हा आकडा केवळ एक संख्या नसून, त्यांच्या सात दशकांच्या कठोर सरावाचा आणि संगीताप्रती असलेल्या अढळ समर्पणाचा एक जिवंत पुरावा आहे.

आशा भोसले यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची ‘व्हर्सटॅलिटी’ . त्या प्रत्येक प्रकारचं गाणं अत्यंत कुशलतेने गाऊ शकत होत्या. त्यांनी शास्त्रीय संगीतापासून कव्वालीपर्यंत, कॅबरेपासून पॉपपर्यंत प्रत्येक जॅनरमध्ये गाणी गायली आहेत.

आशा भोसले यांनी ‘द क्रोनोस क्वार्टेट’ आणि ‘बॉय जॉर्ज’ यांसारख्या कलाकारांसोबत देखील काम केलं आहे. 2011 मध्ये आशा ताई यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं… भारत सरकारने आशा यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह देशाचे सर्वोच्च नागरी आणि चित्रपटविषयक सन्मान देऊन त्यांच्या कलागुणांचा गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button