पिंपरी चिंचवड

दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचे कार्य सदैव प्रेरणादायी — महापौर रवि लांडगे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर कामगार नेते, माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

Spread the love

पिंपरी, दि. २३ मार्च २०२६ 🙁लोकजागृती ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर कामगार नेते, माजी आमदार दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज के.एस.बी.चौक, चिंचवड येथील पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक कुशाग्र कदम, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे यांच्यासह महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच अण्णासाहेब पाटील माथाडी संघटनेचे माजी अध्यक्ष पोपटराव धोंडे, सचिव कृष्णात पाटील, दुर्गेश पाटील, अमोल पाटील, किशोर सातकर, सुनील राणा, मच्छिंद्र चौधरी, शंकर शेलार, राहुल तापकीर, विजय शेटे, विजय गायकवाड यांच्यासह माथाडी कामगार, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा व योगदान सर्वश्रुत आहे, याशिवाय आयुष्यभर माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढा देत त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्यामुळे कामगार चळवळीला नवी दिशा मिळाली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे गरजेचे आहे. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून त्यासाठी अण्णासाहेब पाटील यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.” असे महापौर रवि लांडगे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button