राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहूल भोसले व यांच्या पॅनलच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
अलोट जनसागर आणि ढोल ताशांचा गजर..



पिंपरी (लोकजागृती )महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे दोन दिवस उरले असतांना आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अप) कडून प्रभाग क्र.९ मधून राहूल भोसले यांच्या पॅनेलने प्रभागातील नागरीकांच्या तुफान गर्दीत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या रॅलीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार असल्याने पॅनेलच्या उमेवारांचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत केले.तसेच प्रभागातील नागरीकांनी तथा महीलांनी औक्षण करून या पॅनेलला शुभाशिर्वाद दिले.यावेळी प्रभातील पॅनेलमधील उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील सिध्दार्थ आण्णा बनसोडे,ओबीसी प्रवर्गातील डॉ वैशाली घोडेकर /लोंढे (महीला),सर्वसाधारण महीला गटातील सारीका विशाल म्हासुळकर,सर्वसाधारण पुरूष गटातील राहुल हनुमंत भोसले या सर्व उमेदवारांनी एकत्रीत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी ढोल ताशांनी परीसर दुमदुमून गेला होते.

