भाऊसाहेब भोईर यांच्या हस्त्रे वारकऱ्याचा सन्मान
शेकडो वर्षे वारकरी संप्रदाय जातिभेद विसरून विठ्ठलाच्या चरणी लीन झाला आहे.


पिंपरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यातील दिंडीप्रमुख व भजनी मंडळाच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.
आमदार अश्विनी जगताप, नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सुनील महाजन, माजी नगरसेवक नाना काटे, राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे, आप्पा बागल, सुरेश भोईर, कुणाल वाव्हळ, अनंत कोहऱ्हाळे, राहुल भोईर, नाट्य परिषदेचे जयराज काळे, किरण येवलेकर, रूपाली पाथरे, ह.भ.प. नीलम शिंदे, आसाराम कसबे, राजेंद्र बंग, संतोष रासने आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाल्या की, महाराष्ट्राला धारकरी आणि वारकऱ्यांची मोठी परंपरा आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, तर दुसरीकडे संतांच्या छत्रछायेखाली एकवटलेला वारकरी संप्रदाय पाहायला मिळतो. शेकडो वर्षे वारकरी संप्रदाय जातिभेद विसरून विठ्ठलाच्या चरणी लीन झाला आहे.

नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यातील दिंडीप्रमुखांचा सन्मान केला.यावेळी
दिंडीप्रमुख राजेंद्र महाराज शेलार, सुदाम महाराज नखाते, सीताराम महाराज मातेरे, अनंत महाराज मोरे, दळवी महाराज, कैलास महाराज साठे, सुचिता गटणे, विजया साठे, बाळासाहेब शितोळे, भजनी मंडळांच्या नंदा ढोरे, ऊर्मिला चव्हाण, शैलजा कुलकर्णी, लता कांचन, राजाभाऊ कड, जयवंत चांदेरे, श्याम महाराज देशमुख, काळूराम इंगवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, कान्होपात्रा पवार, हनुमान भजनी मंडळ तसेच भगवद्गीतेतील श्लोक मुखोद्गत केलेल्या श्रावणी नाईक आणि बाळासाहेब मरळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चिंचोलीमधील ग्रामस्थांकडून वारकऱ्यांची सेवा चिंचोलीतील ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळांनी शुक्रवार व शनिवारी वारकऱ्यांना चहा-नाष्टा, भोजनाची व्यवस्था केली होती. झेंडेमळा येथील ग्रामस्थांनी सकाळी नाष्टा व चहाची व्यवस्था केली होती. सीओडी येथे विविध कामगार संघटना, कामगार सहकारी पतसंस्था व डेपोच्या वतीने अन्नदान, फराळ व पाण्याचे वाटप केले



