पिंपरी चिंचवड

जेजुरी -मोरगाव रस्त्यावर भीषण अपघातामध्ये ८जणांचा दुदैवी मृत्यू

Spread the love

जेजुरी (प्रतिनिधी) :  जेजुरी -मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोरील श्रीराम ढाब्यासमोर उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला (क्र. एम एच १२एक्स ,एम ३६९४ ) बारामतीकडे जाणाऱ्या सुझुकी कंपनीची डिझायर कार (क्र. एम एच ४२ ,ऐ एक्स १०६० )भरघाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली .या भीषण अपघातामध्ये ८जणांचा दुदैवी मृत्यू झाला तर तीन ते चार जण जखमी झाले.
हा अपघात बुधवारी (दि.१८) रात्री गभीर अपघात झाला
अपघातामध्ये मृत्यू मुखी पडलेल्यांची नावे पुढील -१)सोमनाथ रामचंद्र वायसे ,रा.नाझरे क.प.(पुरंदर)

२) रामू संजीवन यादव रा .नाझरे क.प.,पुरंदर ,

३)अजयकुमार चव्हाण (उत्तरप्रदेश )

४) अजित अशोक जाधव ,रा.कांजळे ,ता.भोर ,

५)किरण भारत राऊत ,रा.पवारवाडी ,ता.इंदापूर

६)आश्विनी संतोष येसार रा.नागनसूर ,हेद्रे ,सोलापूर ,

७) अक्षय शंकर राऊत ,रा.झारगडवाडी ,ता.बारामती,

८) अनोळखी इसम
स्वीप्ट डिझायर वाहन चालकाचा मृतांमध्ये समावेश आहे ,

तर अपघातामधील तीन ते चार जखमींना खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे समजते ,मात्र ,त्यांची नावे समजू शकली नाहीत .रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ,सहा.पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button