खडकवासला धरण पातळीत झपाट्याने वाढ


🚨महत्वाची सूचना* 🚨
*खडकवासला धरण, ता. हवेली, जि. पुणे*
*दि. 19/06/2025

आज दि. 19/06/2025 रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे *आज ठीक दुपारी . 1.00 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 1920 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.*
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. माहिती साठी सविनय सादर.
*उपविभागीय अभियंता*
खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प



