पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘स्वीकृत नगरसेवक’ पदासाठी ॲड.सौ. विद्या शिंदे(भुजबळ) यांच्या नावाची जोरदार चर्चा
समता परिषदेसह विविध संघटनांचे सुनेत्राताई पवार व योगेश बहल यांना साकडे



पिंपरी-चिंचवड:(लोकजागृती )पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या ‘स्वीकृत नगरसेवक’ पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अभ्यासू कायदेतज्ज्ञ . ॲड.सौ.विद्या जयप्रकाश शिंदे(भुजबळ) यांचे नाव अग्रक्रमाने समोर आले आहे. या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. ना. सुमित्राताई पवार, शहराध्यक्ष योगेशजी बहल आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना अधिकृत निवेदन व समता परिषदेचा ठराव सादर करण्यात आला आहे. २५ वर्षांची राजकीय परंपरा आणि समता परिषदेची निष्ठा,सन १९९९ पासून पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महात्मा फुले समता परिषद यांची अभेद्य युती आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार आणि नामदार छगनजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बहुजन समाजाच्या हितासाठी समता परिषदेने नेहमीच कणा म्हणून काम केले आहे. महानगरपालिकेत समता परिषदेच्या प्रतिनिधीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची २५ वर्षांची परंपरा आहे. हीच परंपरा कायम राखत, यावर्षी ॲड.सौ. विद्या शिंदे यांच्यासारख्या सुशिक्षित आणि निष्ठावान महिला नेतृत्वाला संधी मिळावी, अशी मागणी समता परिषदेचे शहराध्यक्ष प्रदीप खंडू आहेर यांनी केली आहे.
कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक चेहरा ॲड.सौ.विद्या शिंदे (भुजबळ)या केवळ राजकीय कार्यकर्त्या नसून त्या एक प्रगल्भ कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे खालील जमेच्या बाजू आहेत त्या ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ मध्ये ३ सप्टेंबर २०१६ पासून नोंदणीकृत वकील आहेत. त्यांचा नोंदणी क्रमांक MAH/4684/2016 असून त्यांना ८ वर्षांहून अधिक न्यायालयीन कामाचा अनुभव आहे.’अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ॲडव्होकेट बार असोसिएशन, पिंपरी-चिंचवड’ कडूनही त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.प्रशासकीय सुधारणेसाठी संधीची गरज महानगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीत राहून जनहिताची कामे मार्गी लावण्यासाठी ॲड.सौ.विद्या शिंदे(भुजबळ) यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. सुशिक्षित आणि कायदेतज्ज्ञ महिला प्रतिनिधीला महापालिकेत स्थान दिल्यास प्रशासकीय कामकाजात गुणात्मक सुधारणा होईल, असा विश्वास शहरातील विविध सामाजिक संस्थांनी व्यक्त केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व या अभ्यासू आणि निष्ठावान चेहऱ्याला संधी देऊन समता परिषदेचा मान राखणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



