आंतररष्ट्रीयउद्योग विश्व

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचेप्रवासी विमान कोसळून मोठा अपघात झाला.

Spread the love

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळून मोठा अपघात झाला.

    कॅनेडियन, 7 पोर्तुगीज नागरीकही याच विमानातून प्रवास करत होते. या विमानात एकूण 11 लहान मुलं आणि 2 नवजात बालक देखील प्रवास करत होते. तर 217 प्रौढ प्रवासी होते, अशी माहिती आता समोर आली आहे. या विमानातून एकूण 53 ब्रिटीश नागरीक प्रवास करत होते. तर 2 पायलट आणि 12 क्रू मेंबर्स  होते.  प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचा ताबा सुटला आणि अहमदाबादजवळील मेघानीनगर येथील हॉर्स कँम्प परिसरात कोसळले आहे.   मेघनीनगर परिसरात आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर दूरवरून दिसत होता. अपघात होण्यापूर्वी पायलटने एटीसीला दिलेला शेवटचा मेसेज समोर आला आहे.

गुजरात पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षा दलांनी दुर्घटनास्थळी पोहोचून बचाव व मदतकार्य तातडीनं राबवलं. परंतु झालेली जीवितहानी खुप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी, चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button