स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना संधी
उपमुख्यमंत्री अजित पवार; निवडणुकीच्या तयारीला लागा




पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत समाधानकारक यश मिळाले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. या निवडणुकीत तरुणांना अधिकाधिक संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये
लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही
मी राज्यात फिरत असताना सर्वांना सांगत असतो कीष सर्व सोंग करता येतात. पण, पैशांचं सोंग करता येत नाही. राज्याच्या उत्पन्नात देखील वाढ झाली पाहिजे. त्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. पण, कधीकधी बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाहीत; मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का? असा सवाल अजित पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्याचवेळी त्यांनी मी मंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, असे स्पष्ट केले.
पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आणि विकासकामांना गती देण्याचे आवाहन तरुणांना केले.


