पिंपरी चिंचवड

पिंपळे गुरव येथील गोडाऊनला लागलेली आग अग्निशमन विभागाने आणली नियंत्रणात

Spread the love

पिंपरी लोकजागृती:- पिंपळे गुरव येथील भाऊ नगर परिसरातील विश्वकर्मा मंदिराजवळ आज दुपारी सुमारे सव्वाबाराच्या सुमारास चार गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ नियंत्रणात आणली. या घटनेत एक फर्निचर दुकान पूर्णतः जळून खाक झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र, भोसरी उप अग्निशमन केंद्र , तळवडे उप अग्निशमन केंद्र, चोवीसावाडी उप अग्निशमन केंद्र आणि रहाटणी उप अग्निशमन केंद्र येथील पाच पथके गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाली.

भाऊ नगर परिसरातील चिंचोळ्या बोळींमुळे अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. मात्र, अग्निशमन विभागाच्या जवानांनी अवघ्या वीस मिनिटांत आग नियंत्रणात आणली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन विभागाच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कार्यामुळे आग इतरत्र पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

दरम्यान, अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button