अभिनेत्री प्रिया मराठे यांनी आज अखेरचा श्वास घेतला


मुंबई :(लोकजागृती )छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाल्याचे वृत्त समजले. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिने अखेरचा श्वास घेतला. ती अवघ्या 38 वर्षांची होती. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या आजारातून बरीही झाली होती. मात्र, तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला.प्रिया मराठे ही एक मराठी अभिनेत्री आहे. या सुखांनो या ह्या मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत तिने भूमिका करून आपल्या अभिनयास सुरुवात केली.

त्या नंतर विविध मराठी आणि हिंदी मालिका, ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘ स्वराज रक्षक संभाजी,सर्कस’ इत्यादीत भूमिका परपडल्या.
मराठे कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
! अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.
अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली.. !




