महाराष्ट्र

1 फेब्रुवारी रोजी सेलू येथे होत पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा

एस.एम.देशमुख यांनी केली तयारीची पाहणी

Spread the love

 

 

सेलू : वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचे वितरण 1 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे होत असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी आज येथे दिली..

पुरस्कार वितरण सोहळ्याची जोरदार तयारी सेलू येथे सुरू आहे.. एस.एम.देशमुख, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सेलूला जाऊन तयारीची पाहणी केली..

सेलू येथील श्री साई नाट्य मंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे.. नाट्यगृह, भोजन व्यवस्था तसेच निवास व्यवस्थेची पाहणी करून एस.एम.देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.. सेलू तालुका पत्रकार संघ अध्यक्ष लक्ष्मण बागल, इलियास, कांचन कोरडे यांनी एस.एम.देशमुख, सुरेश नाईकवाडे, अनिल वाघमारे, परभणी जिल्हा अध्यक्ष प्रभू दिपके, लक्ष्मण माणोलीकर, राजू हटेकर यांचे स्वागत केले.

पुरस्कार वितरण सोहळयास राज्यभरातून 600 पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा गृहित धरून तयारी केली जात आहे. एस.एम.देशमुख यांनी आज स्वागताध्यक्ष विनोद बोराडे, तसेच माजी नगराध्यक्ष हेमंत आडाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि स्वागताध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल विनोद बोराडे यांचे आभार मानले..

सेलू हे परभणी जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे.. मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या या शहरात सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम सातत्यानं सुरू असतात.. स्वच्छ आणि सुंदर असे हे शहर रेल्वे आणि महामार्गाने महाराष्ट्राशी जोडले आहे.. मुंबईहून मनमाडमार्गे नांदेडकडे जाणारया रेल्वे मार्गावर सेलू स्थानक आहे.. सर्व गाड्या येथे थांबतात.. संभाजीनगरहून रस्ता मार्गे सेलूला येता येते.. सांगली, कोल्हापूर, कोकणातून येणारया पत्रकारांना धारूर, माजलगाव, पाथरी मार्गे सेलूला येता येते…

सेलू येथील कार्यक्रमास परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button