उद्योग विश्वपिंपरी चिंचवडसामाजिक

नंदाआई फाउंडेशन मार्फत जागतिक घरेलू कामगार दिनाचे आयोजन : रेणुका भोजने

महिला कामगारांच्या सक्षमीकरणासाठी व हक्कासाठी कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

16 जून जागतिक घरेलू कामगार दिन

पिंपरी :पिंपरी – मोरवाडी :- जागतिक घरेलू महिला कामगार दिन नंदाआई प्रतिष्ठान तर्फे केक कापुन साजरा करण्यात आला .सौ. रेणुकाताई भोजने व श्री दिपक भोजने यांनी घरेलु कामगार संदर्भात माहिती सांगितली येत्या रविवारी डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मानवी साखळी करण्यात येणार आहेनंदाई फाउंडेशन मार्फत रेणुका भोजने यांनी कामगारांच्या हक्कासाठी,१६ जून, जागतिक घरेलू कामगार दिन होता. हा दिवस जगभरातील घरेलू कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या योगदानाबद्दल जगरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.          हा दिवस दरवर्षी १६ जून रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) कन्योन्यान १८९ (Convention 189) वर्धापनदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या अधिदेशनामध्ये घरेलू कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला गेला आहे.

भारतातील परिस्थिती:

भारतात घरेलू कामगारांची संख्या मोठी आहे आणि त्यापैकी बहुतेक महिला आहेत. अनेक घरेलू कामगारांना कमी वेतन जास्त काम आणि असुरक्षित कामाच्या ठिकाणी काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी काम करणे आवश्यक आहे.

यावेळी रेखा वाघमारे , कल्पना सकट , अर्चना सुर्यवंशी , सरोजा मोटे , मिनाक्षी जाधव , लता दास , सविता रेवाळे , मनिषा चव्हाण, गायत्री जाधव , कांचन भडकुंबे, गीता गायकवाड, व इतर घरेलु महिला कामगार उपस्थित होते

सर्व घरेलु कामगार महिलांना जागतिक घरेलु कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . सौ. रेणुकाताई दिपक भोजने श्री दिपक ज्ञानदेव भोजने यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button