पिंपरी चिंचवड

शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीकडून निमंत्रण -सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर. 

Spread the love

 

 

        मुंबई /पंढरपूर (ता.17) आषाढी शुध्द एकादशी रविवार दि. 06 जुलै, 2025 रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज दिनांक 17 जून रोजी वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

      यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांना मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button