उद्योग विश्वमहाराष्ट्रराष्ट्रीय

महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस!मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्राचा मोठा निर्णय

मी मराठी

Spread the love

लोकजागृती :केंद्र सरकारने मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयाचा महायुतीला किती फायदा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची मागणी अखेर आज मान्य झाली आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. केंद्राने मराठीसह बंगाली, पाली, आसामी, प्राकृत या ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांसह साहित्य क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. या सर्वांचे तसेच सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचे त्यावर प्रेम असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button