पिंपरी चिंचवड

प्रभाग क्र. ९ मध्ये जनसागर लोटला… भव्य विजय संकल्प जाहीर सभा – यशस्वी संपन्न!

Spread the love

 

प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आयोजित केलेली “भव्य विजय संकल्प जाहीर सभा”आज मतदार बंधू-भगिनी प्रचंड उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. आजची ही गर्दी आणि लोकांचा उत्साह पाहता, आमचा विजय निश्चित आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे!

या ऐतिहासिक सभेचे रान पेटवण्यासाठी आणि आम्हा सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक: पिंपरी-चिंचवड मनपा चे मा. महापौर श्री. हनुमंतराव ( आण्णा ) भीमराव भोसले आणि महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष, आमदार- पिंपरी विधानसभा मा. श्री. अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!

आमचे सक्षम पॅनेल – विकासाचे शिलेदार: घड्याळाचा गजर करण्यासाठी सज्ज असलेले चारही उमेदवार:

 

श्री. सिध्दार्थ अण्णासाहेब बनसोडे (अ)

सौ. डॉ. वैशालीताई घोडेकर (लोंढे) (ब)

सौ. सारीकाताई विशाल मासुळकर (क)

श्री. राहुल हनुमंतराव भोसले (ड)

 

बंधू आणि भगिनींनो, ही फक्त सभा नव्हती, तर हा परिवर्तनाचा एल्गार होता! ही गर्दी म्हणजे आमचा विश्वास आहे, आणि तुमची उपस्थिती हीच प्रभागाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल आम्ही सर्वजण ऋणी आहोत. आता एकच ध्येय, एकच लक्ष…विकास…!

येणाऱ्या निवडणुकीत ‘घड्याळ’ ⏰ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या हक्काच्या माणसांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा!

 

चला, प्रभाग ९ चा कायापालट करूया!

विजय आपलाच, निर्धार पक्का! ✌️🚩

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button