पिंपरी चिंचवड

शाश्वत विकासाच्या दृष्टीने उमेदवार निवडण्याचे गोपाळ कांबळे यांचे मतदार बंधू भगिनींना आव्हान

Spread the love

प्रभाग क्रमांक 27 अ अनुसूचित जाती प्रवर्गातून भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवार श्री गोपाळ चंद्रकांत कांबळे यांनी मतदार बंधू-भगिनींना भावनिक आव्हान करून प्रचाराची मोहीम जोरदार राबवली आहे. केवळ रस्ते, ड्रेनेज, पाणी या मूलभूत समस्याच सोडविणे म्हणजे विकास नव्हे, महिलांचे आजही प्रश्न आहेत शाळेत मुलांना सोडवताना असणारी वाहतूक समस्या. युवकांचे प्रश्न आहेत आम्हाला क्रीडांगण कुठे. बचत गटांच्या महिलांचे प्रश्न आम्हाला योजना चा लाभ मिळत नाही याशिवाय सर्वांचे सामाजिक ,आर्थिक, परिवर्तन सर्व समाज बांधवांचे करून घेणे हा सुद्धा विकासाचा एक भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरी विचाराने पुढे जाऊ अशी भूमिका गोपाळ कांबळे यांनी मांडली आहे. *पालखीमध्ये चालणारा की पार्टी ला बसणारा* आपला प्रतिनिधि कसा असावा असे म्हणणे मांडून लक्ष वेधून घेत आहेत.सर्व युवक वर्ग यांना शैक्षणिक योजना.महिला भगिनी. बेरोजगार तरुण. अशिक्षित महिला अशा सर्व वर्गाचे कौशल्य विकास करून बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय साठी योजना राबवून समाजाची सर्वांगी उन्नती घडवण्याचे काम करण्याचा मानस घरोघरी जाऊन प्रचाराद्वारे सांगण्यात येत आहे. केवळ निवडणुकीपुरते आमिष दाखवून साड्या वाटप करणे, वैद्यकीय उपचार शिबिर लावणे, आणि आपले लक्ष वेधून घेणे अशा गोष्टींपेक्षा ज्या खऱ्या समस्या आहेत त्या सोडून देण्याचे आश्वासन मतदारांच्या भेटीमध्ये त्यांनी दिले आहे.

संघर्षाच्या यशोगाथेमध्ये स्वतः कष्टाने जिद्दीने उभे राहून आपल्याबरोबर आपल्या सर्व समाज बांधवांना सुद्धा याच प्रेरणेतून हाच दृष्टिकोन ठरवून खऱ्या अर्थाने काम करण्याचे व हीच समाज उपयोगी सेवा आहे केवळ सेवक म्हणून मानसिकता ठेवून आपण काम करावं अशी घोषणा त्यांनी केली आहे. वारकरी संप्रदाय,गुरुदत्त चरणी सेवा, अशा धार्मिक अधिष्ठानामुळे स्वच्छ चारित्र्याचे प्रतिनिधित्व राहटणीतून मिळणार आहे. आणि यामुळे या भागाचा शाश्वत विकास कसा होईल यासाठी प्रयत्न होत राहणार आहे स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी दिलेल्या आदर्शाने व विकासाच्या दृष्टीने काम करत राहणार याच मानसिकतेतून आम्ही उमेदवारी मागत आहोत ही भावना गोपाळ कांबळे यांची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button