पिंपरी चिंचवड

आरंभ है प्रचंड!”आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

Spread the love

पिंपरी (लोकजागृती) देशाचे कणखर नेतृत्व मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शहा तसेच राज्याचे गतिमान नेतृत्व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यानेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख विचारधारेत सहभागी होत आहेत. हा पक्षप्रवेश म्हणजे केवळ राजकीय प्रवेश नसून, भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्यावर व नेतृत्वावर जनसेवकांचा वाढता विश्वास असल्याचे स्पष्ट द्योतक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांसह विविध पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असून, आज झालेला पक्षप्रवेश आमदार अमित गोरखे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली तसेच महेश दादा लांडगे शंकर भाऊ जगताप उमाताई खापरे आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पार पडला.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मातब्बर लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत सामील होत आहेत.

शेट्टी व बाबर कुटुंबियांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

भाजपा पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज शहरातील हॉटेल व्यावसायिक क्षेत्रात तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख असलेल्या शेट्टी कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

विशेष बाब म्हणजे, दिवंगत खासदार गजानन बाबर यांच्या कुटुंबियांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यावेळीमाजी नगरसेवक श्री. माजी नगरसेवक श्री. प्रकाश बाबर, माजी नगरसेविका सौ. शारदा बाबर, श्री. अमित प्रकाश बाबर, सौ. एैश्वर्या बाबर यांचे पक्षात स्वागत केले.

तसेच, माजी नगरसेवक श्री. उल्हास शेट्टी, माजी नगरसेवक श्री. प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका सो. अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. देवीदास गोफणे, श्री. महेश गोफणे, महेश सहकारी बँकेचे श्री. अजय लढ्ढा, श्री. महेश काटे, श्री. संजय जगताप, श्री. लवकुश यादव, श्री. चेतन शेटे, श्री. गणेश कंकावणे, श्री. ऋिषी शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button