गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची उभारणी केली
जैन समाजाच्या राजकीय पक्ष यांनी या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे



चलो पुणे!चलो पुणे !!चलो पुणे!!!
*मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सहभागातून पब्लिक ट्रस्टची ३००० कोटी मालमत्ता २३० कोटी हडपन्याचा डाव उधळण्यासाठी जैन समाजाच्या मोर्चात सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा!*
मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे सन१९५८ ला सकल जैन समाजाचे हिराचंद नेमचंद दोषी यांनी तीन एकर जागेत. एक धर्मादाय ट्रस्ट स्थापन करून समाजाकडून निधी जमा करून दिगंबर जैन बोर्डिंग व जैन मंदिर मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची उभारणी केली होती.
सातारा,सांगली,कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, आहिल्यानगर सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी याच बोर्डिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊन ते स्थिर स्थावर झाले.
हिराचंद नेमचंद दोषी यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे उदात्त काम केले. याचा पब्लिक ट्रस्ट केला. मात्र त्यांच्या वारसदारांनी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी ही पब्लिक ट्रस्टची ३ एकर जागा गोखले कंट्रक्शन कंपनी यांना र.रु.२३० कोटी रकमेत विकली आहे. हे सर्व व्यवहार ३० सप्टेंबर २०२५ साठेखत करून गोखले कंट्रक्शन कंपनीने १ आक्टोंबर २०२५ रोजी कर्नाटकातील दिनेश्वर पतसंस्थेकडून ५० कोटी व बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडून २० कोटी कर्ज मंजूर करून घेतले आहे.
ही तीन एकर जागा एच.एन.डी.च्या मालकीची असताना ही जागा गोखले कंट्रक्शन कंपनीला मिळणार आहे असे गृहीत धरून हे ७० कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
धर्मादाय आयुक्त पुणे यांनी या पब्लिक ट्रस्टच्या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम,कायदे यांना हरताळ फासून या विक्री व्यवहाराला मंजुरी दिली आहे. हे धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत. तर गोखले कंट्रक्शन कंपनी मध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे भागीदार आहेत.
या विषयावर पुण्यात गोखले कंट्रक्शन कंपनीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या प्रकल्पातून ३००० कोटी रुपये आम्हाला मिळणार आहेत असे जाहीर केले होते. म्हणजे ३००० कोटीची मालमत्ता २३० कोटीमध्ये राजअश्रयांने हडप करण्याचा डाव मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी मांडला आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून या गंभीर विषयाच्या बाबत *प.पु. जैनाचार्य श्री गुप्तीनंदाजी गुरुदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सकल जैन समाजाच्या वतीने हे विक्री सर्व व्यवहार रद्द करून ही पब्लिक ट्रस्टची जागा वाचवण्यासाठी शुक्रवार दि.१७ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. एच.एन.डी. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथून जिल्हाधिकारी पुणे असा शांततेत, अहिंसक पद्धतीने सकल जैन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.*
तरी सकल जैन समाजाच्या या जनहिताच्या मोर्चामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील इतर सर्व समाज बांधवांनी तसेच सामाजिक संस्था, संघटना व सर्व राजकीय पक्ष यांनी या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. हि मी नम्र विनंती करत आहे.
मारुती भापकर
मो.न.९९२२५०१६३०
विनोद डोरले
९४२१२२५६३२




