अनुसूचित जाती कल्याण समिती घेणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची झाडाझडती
अनुसूचित जाती कल्याण समिती ही तीन दिवसांच्या पुणे जिल्हा दौऱ्यावर



पिंपरी (लोकजागृती )अनुसूचित जाती कल्याण समिती ही तीन दिवसांच्या पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून दिनांक 19 व 20 सप्टेंबर 2025 रोजी समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे नवनगर विकास प्राधिकरण तसेच एमआयडीसी पुणे येथे भेट देणार आहे.
*या दौऱ्यात समितीमार्फत पदोन्नती, आरक्षण, अनुशेष, जातपडताळणी विषयक बाबी तसेच अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व विकासकामांची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे*
*समितीचे अध्यक्ष ना. नारायणजी कुचे व सदस्य आमदार अमित गोरखे यांनी याबाबत माहिती दिली.* या समितीमध्ये आमदार अमोल मठकरी, तानाजी मुटकुले, भिमराव केराम, अशोक माने, श्याम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, संजय बनसोडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम आणि प्रज्ञा सातव हे सदस्य आहेत.
*समितीचे अध्यक्ष यांनी यावेळी आवाहन केले की,*
*“ज्यांच्या कोणत्याही तक्रारी अथवा विषय आहेत त्यांनी समितीशी थेट संपर्क साधावा.”*


