पिंपरी चिंचवडशिक्षण

नीळकंठ मालाडकर सर वय ९१ जेष्ठ शास्त्रज्ञ आणि साहित्यिक यांनी आज अखेर चा श्वास घेतला

Spread the love

*भावपूर्ण श्रद्धांजली*

*डॉ. नीळकंठ मालाडकर सर वय ९१ जेष्ठ शास्त्रज्ञ आणि साहित्यिक ( ५ फेब्रुवारी १९३५ – ७ सप्टेंबर २०२५ ) एक सुंदर जीवन*

पिंपरी   (लोकजागृती)    *डॉ. नीळकंठ मालाडकर सर हे बायो-केमिस्ट्रीचे वैज्ञानिक होते. त्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई , हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड पिंपरी , पुणे आणि एमगोल्ड एनर्जिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये संशोधन संचालक म्हणून काम केले . त्यांनी टेट्रासायकलीन आणि हॅमायसिन सारख्या अँटिबायोटिक्सच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केली आणि जंगली कंदांपासून डेक्सट्रोज व इथेनॉल तयार करण्याची पद्धत विकसित केली. आपल्या कारकिर्दीत ते फार्मासिटिकल्स , ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात आघाडीचे अभ्यासक ठरले.*

            *त्यांचा विश्वास होता की वैज्ञानिक कधीही निवृत्त होत नाही. व्यावसायिक कामानंतर त्यांनी लेखनाकडे वळून विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी इंग्रजी सोबत मराठीतही लेखन केले. त्यांच्या विज्ञान प्रेरित साहित्यामध्ये प्रीत रंगली सागरी ( तेल शोधावरील कादंबरी ) , पृथ्वीच्या पोटी हिरा कोटी , कोटी ( कोळसा शोधा वरील कादंबरी ) , स्वानंदी ( कथा संकलन ) आणि राजस ( कवीतासंग्रह ) यांचा समावेश होतो . हे सर्व लेखन वाचकांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्य निर्माण करणारे ठरले.*

       *त्यांचे रविवार दिनांक ७ सप्टेंबर , २०२५ रोजी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर , पुणे येथे वयाच्या ९१ वर्षी वयोमानानुसार आजारपणात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ उज्वला सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका एच. ए‌ . स्कूल , पिंपरी ( सुप्रसिद्ध विज्ञान व गणित शिक्षिका ) , दोन मुले श्री. समीर ( केमिकल इंजिनियर वैज्ञानिक व उद्योजक ) , आणि डॉ‌. मनीष ( सीनियर प्रेसिडेंट – ॲरिस्टो फार्मासिटिकल लि. ) , सुना सौ. दिपाली व सौ‌. संगीता , नातवंडे ऊर्जा , केया , प्रीना , नातेवाईक आणि अनेक मित्र असा त्यांचा मोठा परिवार आहे . खरे वैज्ञानिक आणि सज्जन व्यक्तिमत्व म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहील . डॉ. निळकंठ मालाडकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.*🙏 भावपुर्ण श्रद्धांजली!🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button