पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगूल वाजले, प्रारुप प्रभागरचना जाहीर
प्रारुप प्रभागरचना जाहीर


पिंपरीः (लोकजागृती )आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने एक मोठी घडामोड शुक्रवारी (ता.२२) घडली. आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी प्रारुप प्रभागरचना ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन ही जाहीर झाली. त्यानुसार पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच आगामी निवडणूक होणार असून प्रभागाची संख्या ३२ कायम आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे ही निवडणूक होत असून १२८ पैकी निम्या म्हणजे ६४ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. ऐन गणेशो -त्सवातच या प्रभाग रचनेवर हरकती, आक्षेप नोंदवायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर राजकीय पक्षांसह प्रशासन तथा निवडणूक आयोग

तयारीला लागले. पिं.चि. मनपा चा निवडणूक विभाग प्रभाग रचनेत गुंतला. त्यांनी तयार केलेल्या या रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरती आज जाहीर झाली अन या निवडणुकीचे खऱ्या अर्थाने बिगूल वाजले. या कच्या प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहेत. म्हणजे ऐन गणेशोत्सवात आक्षेप नोंदवावे लागणार आहेत. परिणामी त्याला मुदतवाढ देण्याची मागणी होऊ शकते. जेणेकरून हा उत्सव संपल्यानंतर हरकती घेता येऊ शकतील हरकतींवर १२ सप्टेंबरपर्यंत त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना ही ६ ऑक्टोबर पर्यंत आयोग जाहीर करणार आहे. त्यामुळे ही निवडणूक दिवाळी झाल्यानंतरच डिसेंबर वा जानेवारीत होईल, असा अंदाज आहे.



